बाभुळवाडीत गोठ्याला आग, जनावरे होरपळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 20:00 IST2019-05-13T20:00:29+5:302019-05-13T20:00:51+5:30
दोन म्हशी गंभीर : रविवारी मध्यरात्रीची घटना

बाभुळवाडीत गोठ्याला आग, जनावरे होरपळली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील बाभुळवाडी येथे एका खळ्याला अचानक लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळाला़ यात दोन बैल, सहा म्हशी होरपळून जबर जखमी झाल्या आहेत़ ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली़
तालुक्यातील बाभुळवाडी येथील शेतकरी मन्साराम मिठाराम पाटील यांची दोन एकर शेती आहे़ या वर्षी शेतात उत्पन्न खुपच कमी आले़ उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला़ त्यात पावसाने पाठ फिरविली़ कमी पावसामुळे शेतात काही पिकले नाही़ त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणुन सहा म्हशी हप्ताने विकत घेतल्या़ म्हशींसाठी चारा नसल्यामुळे तीन ट्रकभर चारा बाहेरगावाहुन विकत घेतला होता़ गाडी भाडेसह नव्वद हजार आणला होता़ तो चारा शेतात ठेवला होता़ रविवारी रात्री साडेअकरा वाजता चाºयाला अचानक आग लागली चाºयापासुन अगदी हाकेच्या अंतरावर सहा म्हशी व दोन बैल बांधले होते़ त्या आगीच्या ज्याळा म्हशीपर्यंत पोहचल्या़ त्यात तीन म्हशी गंभीररित्या भाजल्या गेल्या़ शिवाय यात एक बैल गंभीररित्या भाजला गेला आहे़ रात्री साडेअकरा वाजता शेजारी शेतामधे राहणाया सालदाराने तेथे जाऊन म्हशी व बैल यांना सोडले़ त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे़
शेतात चारा सुरक्षित ठिकाणी ठेवला होता़ आग लागण्यासारखे काही नव्हते़ या बाबतीत शेतकरी आसाराम पाटील यांना विचारले असता, चारा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवुन दिल्याचे त्यांनी सागितले़ उशिरापर्यंत सर्कल व तलाठी उपस्थित नव्हते़ झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयाना मिळावी, अशी मागणी सरपंच किरण पवार व माजी सरपंच भाऊसाहेब देसले यांनी केली आहे़