शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेमुळे उपजिल्हा रूग्णालयातील अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

दोंडाईचा : दोंडाईचासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच ऑक्सिजन सिलिंडरचा वापरही वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ५० ...

दोंडाईचा : दोंडाईचासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच ऑक्सिजन सिलिंडरचा वापरही वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ५० कोरोनाबाधित रुग्णांना बाहेरून ऑक्सिजनची मात्रा पुरवली जात आहे. मात्र, आज ॲाक्सिजन संपल्याचे एका लोकप्रतिनिधीच्या लक्षात आले. त्यानंतर यंत्रणा हलली. यावेळी जर वेळेत ॲाक्सिजन उपलब्ध झाला नसता, तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात चार संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

दोंडाईचा परिसरातील कोरोनाबाधित रुग्ण उपजिल्हा रुग्णालय व कामगार कल्याण मंडळातील कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे ९० रुग्णांना बाहेरून ऑक्सिजनची मात्रा पुरवावी लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजनची सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, नैसर्गिकरित्या ऑक्सिजन न घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे साहजिकच बाहेरून ऑक्सिजनची मात्रा घेणारे वाढले आहेत. सहज श्वास घेण्यास अडचण असणारे व बाहेरून ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

बुधवारी सकाळी दोंडाईचा नगरपालिकेच्या माजी सभापती मनीषा गिरासे यांचे सहाय्यक जितेंद्र गिरासे हे नेहमीप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करण्यासाठी गेले असता, त्यांना ऑक्सिजन सिलिंडर संपत असल्याचे लक्षात आले. जेमतेम अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो, ही बाब लक्षात आल्यावर गिरासे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार चन्द्रे ,जिल्हा शल्य चिकित्सक सांगळे यांना फोन लावला, मात्र तो लागला नाही. त्यांनी तत्काळ आमदार जयकुमार रावल यांचाशी संपर्क साधून ही माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र राजपूत, हितेंद्र महाले, उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. रावल यांनी दोंडाईचातील औषध विक्रेता राजेश मुनोत व अंकुश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्याचे सुचवले. त्यानुसार चार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. हे चार सिलिंडर ऑटोमॅटिक ऑक्सिजन सिलिंडर सिस्टिमला लावण्यात आल्यामुळे होणारा अनर्थ टळला.

दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास धुळे येथून ऑक्सिजन सिलिंडरची गाडी आली असून, आता साठा भरपूर असल्याचे सांगण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरच्या साठ्याबाबतचा आढावा घेण्यासाठी अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक तिवारी, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी याठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. सिलिंडरची गाडी येवून ते कार्यान्वित होईपर्यंत ते उपजिल्हा रुग्णालयात बसून होते.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धुळ्याला व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोंडाईचाला भेट देऊनही दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात सुधारणा होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.