‘बहिणाई’ या अहिराणी काव्यसंग्रहाचे कुलगुरू पी. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST2021-02-09T04:38:53+5:302021-02-09T04:38:53+5:30
काव्यसंग्रहाचे प्रकाशन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते आणि दिलीप रामू पाटील ...

‘बहिणाई’ या अहिराणी काव्यसंग्रहाचे कुलगुरू पी. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन
काव्यसंग्रहाचे प्रकाशन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते आणि दिलीप रामू पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रकाशन समारंभानंतर कुलगुरू पी. पी. माहुलीकर, सहसंचालक प्रा. डॉ. सतीश देशपांडे, कुलसचिव प्रा. डॉ. बी. व्ही. पवार यांना या बहिणाई काव्यसंग्रहाच्या प्रती प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांच्या हस्ते भेट देण्यात आल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे, भागवत सोनवणे, अहिराणी काव्यसंग्रहाचे संपादक डॉ. संजय खोडके, डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाठ, प्रा. के. डी. कदम आणि प्रा. डॉ. बी. सी. मोरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक व संचलन डॉ. संजय खोडके यांनी केले.
कॅप्शन - पिंपळनेर महाविद्यालयाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त खानदेशस्तरीय खुली ऑनलाइन अहिराणी काव्यवाचन व काव्य संमेलन स्पर्धेतील अहिराणी कवितांचा काव्यसंग्रह ‘बहिणाई’च्या प्रकाशन प्रसंगी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, व्य. प. सदस्य दिलीपदादा रामू पाटील, प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे, भागवत सोनवणे, डॉ. संजय खोडके, डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाठ, प्रा. के. डी. कदम आणि प्रा. डॉ. बी. सी. मोरे.