शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशन भागातील भाजीपाला बाजाराचे केले अन्यत्र स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

दोंडाईचा : दोंडाईचा शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने शासन व प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. स्टेशन ...

दोंडाईचा : दोंडाईचा शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने शासन व प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. स्टेशन भागातील भाजीपाला बाजारात ग्राहकांचा होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. कोरोना संसर्ग रोखण्याचा पार्श्वभूमीवर दोंडाईचा नगरपालिकेने स्टेशन भागातील भाजीपाला-फळे विक्रेत्यांना दुसऱ्या जागी स्थलांतरित केले आहे. उद्या, सोमवारपासून या विक्रेत्यांना नवीन जागेवर जाणे बंधनकारक आहे. जुन्या जागी विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

स्टेशन भागात लोटगाडीवर फळे-भाजीपाला विक्रेते विक्री करतात. त्या ठिकाणी वाहनांची कोंडी होते. मधल्या भागात भाजीपाला विक्री होत असून, तो भाग अरुंद आहे. जवळजवळ लोटगाड्या लावल्याने या भागात ग्राहकांची खूपच गर्दी होऊन जाते. सोशल डिस्टन्स अजिबात ठेवले जात नाही. अनेक विक्रेते मास्क लावतच नाही, बरेच ग्राहक बिना मास्क भाजीपाला बाजारात फिरत असतात. या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा नगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, शहरातील जाणकार नागरिक यांचा नियोजनातून भाजीपाला व फळ विक्रेते यांना नवीन जागा देण्यात आली आहे. आप्पासाहेब ग्राऊंडला सदर बाजार स्थलांतरित करण्यात आला असून, भाजीपाला-फळ विक्रेते यांचा सोशल डिस्टन्ससाठी मार्किंग करण्यात आले आहे.

नवीन जागेत भाजीपाला व फळे घेण्यासाठी ग्राहकांनी यावे. विक्रेते व ग्राहक यांनी आपले व शहराचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी याच जागी डिमार्क नुसार, विशिष्ट अंतर ठेवून विक्रेत्यांनी विक्री व ग्राहकांनी खरेदी करावी, असे आवाहन नगराध्यक्षा नयनकुवर रावल, अपर तहसीलदार सुदाम महाजन, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले आहे.