Video : 'मोदीजी आम्हालाही 10 मिनिटांची सूट द्या', देशातील गद्दारांच काम तमाम करू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 23:22 IST2019-02-18T22:52:06+5:302019-02-18T23:22:52+5:30

राज्यातील धुळे जिल्ह्यात तेलंगणाचे एकमेव भाजपा आमदार राजासिंह यांनी सभेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वच मावळ्यांचे मी मनापासून आभार मानतो,

Vedio: 'Modiji give us 10-minute discount', Shocking statement by BJP MLA Raja Singh's speech in Maharashtra | Video : 'मोदीजी आम्हालाही 10 मिनिटांची सूट द्या', देशातील गद्दारांच काम तमाम करू'

Video : 'मोदीजी आम्हालाही 10 मिनिटांची सूट द्या', देशातील गद्दारांच काम तमाम करू'

हैदराबाद - तेलंगणातीलभाजपा आमदार राजासिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवताना पाकिस्तानवर कडाडून टीका केली. तसेच मोदीजी, ज्याप्रमाणे सैन्य दलाला सूट दिलीय, तशीच सूट आम्हालाही द्या. केवळ 10 मिनिटांची सूट आम्हालाही द्या, देशाचे गद्दार अन् देशातील दहशतवाद्यांचं काम आम्ही तमाम करतो, असे म्हणत राजासिंह यांनी देशात राहून देशविघातक कृत्य करणाऱ्यांना सुनावले आहे. यावेळी, धुळे येथे राजासिंह यांनी प्रक्षोभक भाषण केलं.

राज्यातील धुळे जिल्ह्यात तेलंगणाचे एकमेव भाजपा आमदार राजासिंह यांनी सभेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वच मावळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, असे  म्हणत राजासिंह यांनी सभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बोलताना, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. तसेच भारतीय सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. आता, देश तुमच्या स्वाधीन आहे, जो निर्णय घ्यायचाय तो घ्या, आम्ही आपल्यासोबत आहोत. देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जवान तुमच्यासोबत आहे. मोदींच्या आदेशानंतर सैन्यानेही आपलं काम सुरू केलं आहे. सीमारेषेवर दुश्मनांचा खात्मा करण्याचं काम सैन्यानं सुरू केलंय. पण, मोदीजी भारतीय सैन्याला जशी सूट दिली, तशीच केवळ 10 मिनिटांची सूट आम्हाला द्या. आम्ही त्यांचं काम करतो. 
जेव्हा देशातील जवानांवर हल्ला झाला, भारतीय सैन्य तिकडे तडफडून प्राणाची आहुती देत होते, आणि सोशल मीडियावर देशातील गद्दार मुस्लीम चांगलं झालं, म्हणत आनंद साजरा करत होते, असे राजासिंह यांनी म्हटले आहे.

तुम्ही या देशात जन्माला आलात, या देशात राहता, या देशात खाता आणि आमच्या सैन्याच्या मृत्यूचं सेलिब्रेशन करता. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेतलं असून 96 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात राहून, पाकिस्तान झिंदाबाद, जैश ए मोहम्मद झिंदाबादच्या घोषणा देणारे हे कोण आहेत ? देशातील या गद्दारांचे काम तमाम करण्यासाठी आम्हाला 10 मिनिटांची खुली सूट द्या,  असे आवाहनच भाजपा आमदार राजासिंह यांनी मोदींना केले. तसेच आपण सर्जिकल स्ट्राईक केला, आता मोठा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याचेही राजासिंह यांनी म्हटले. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Vedio: 'Modiji give us 10-minute discount', Shocking statement by BJP MLA Raja Singh's speech in Maharashtra