५३ हजार बालकांना दिली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:50 PM2020-01-19T22:50:52+5:302020-01-19T22:51:36+5:30

पोलिओ लसीकरण : वंचित बालकांना मंगळवारपासून घरोघरी मिळेल लस

Vaccines given to 4,000 children | ५३ हजार बालकांना दिली लस

Dhule

Next

धुळे : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ६१ हजार ५८६ लाभार्थीचे उदिष्टे दिले होते़ त्यापैकी ५३ हजार ११२ बालकांना लस देवून लसीकरणाचे ८४.२४ उद्दिष्ट पूर्ण केले.
मनपाच्या जुन्या इमारतीतील दवाखान्यात पोलिओ मोहिमेचा शुभारंभ महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, महिला व बालकल्याण सभापती निशा पाटील, विरोधी पक्षनेता साबीर शेख, आयुक्त अजिज शेख, उपायुक्त गणेश गिरी, मनपा आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डब्ब्लु एचओचे प्रतिनिधी अझर मोह यांच्या उपस्थितीत लहान बालकाला पोलिओची लस देवून केला.
शहरातील महानगरपालिकेच्या १३ दवाखान्यासह बालरोग तज्ज्ञ डॉक्टर, काही मोठे रूग्णालये अशा १६५ लसीकरण केंद्राची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. याशिवाय बसस्थानक, रेल्वेस्थानक, टॅक्सी स्टॉप, बगीचे, खासगी दवाखाने आदी ठिकाणीही लसीकरणासाठी पथकाची नियुक्ती केली गेली होती.
२१ ते २५ जानेवारी या ५ दिवसात घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना लस देणायात येणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

Web Title: Vaccines given to 4,000 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे