शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियानांतर्गत १३,५९४ विद्यार्थ्यांना गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:17 IST

विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार

दोंडाईचा : कोरोना संसर्गचा पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीचा प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी या वर्षी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार आहे. या नुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोंडाईचातील सुमारे ७०० विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. दोंडाईचासह शिंदखेडा तालुक्यातील १३ हजार ५९४ विद्यार्थ्यांना एक गणवेश शिवून मिळणार आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या सर्व विद्याथीर्नीना, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्याना एक गणवेश शिवून मिळणार आहे. शाळा व शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्या नुसार तालुक्यातील ७ हजार १५९ विद्यार्थिनीना, अनुसूचित जातीतील ३ हजार ८४४ विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीच्या ५१० विद्यार्थ्यांना व ५ हजार ८१ दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना अशा एकूण १३ हजार ५९४ विद्यार्थ्याना मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून सुमारे ४० लाख ७८ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २३ डिसेंबरला नववी ते बारावीचा विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले असून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांचे वर्ग अद्याप सुरू झाले नाहीत. निधी मंजूर झाल्यावर चांगल्या प्रतीचे कापड विकत घेतले जाणार असून त्या पासून माप घेऊन गणवेश शिवून दिला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे