विनापरवाना उत्पादित भाजीपाला बियाण्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:06 IST2019-06-19T13:05:39+5:302019-06-19T13:06:45+5:30
लोकमत न्यूज धुळे : विनापरवाना उत्पादित केलेल्या बियाण्याची ६०९ पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील दहीवेल येथून जप्त केली. ...

विनापरवाना उत्पादित भाजीपाला बियाण्याचा साठा जप्त
लोकमत न्यूज
धुळे : विनापरवाना उत्पादित केलेल्या बियाण्याची ६०९ पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील दहीवेल येथून जप्त केली. मंगळवारी केलेल्या या कारवाई प्रकरणी दिल्ली, पुणे व दहीवेल येथील मिळून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे निरीक्षक मनोजकुमार शिसोदे यांनी या प्रकरणी दहीवेल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दहीवेल येथील माहेश्वरी कृषी सेवा केंद्र येथे तपासणीदरम्यान वेलकम कापे सायनस लि.नवी दिल्ली या कंपनीचे विनापरवाना उत्पादित केलेले विविध भाजीपाला पिकाच्या बियाण्याची एकूण ६०९ पाकिटे विक्रीच्या उद्देशाने साठविलेली आढळली. हा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत २ लाख ७३ हजार ४९० रुपये एवढी आहे.
या प्रकरणी कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक शिंदे (४८) रा.सर्व्हे नं.३४, चव्हाण कॉम्प्लेक्स, धनकवडी पुणे, कंपनीचे संचालक सुरेंद्र सिंग, ओमप्रकाश सिंग, रा.दिल्ली व महेंद्र प्रेमराज कलंत्री, रा.दहीवेल, ता.साक्री या चौघांविरूद्ध भादंवि कलम ४२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम व बियाणे कायद्यान्वये मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील कोणासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.