शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

लॉकडाऊनमध्ये वनप्राण्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 10:24 PM

शिरपूर : पकडलेल्या ७२ सापांना सोडले जंगलात, कासव व घोरपडचे वाचविले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊन काळात प्राणी मित्र हे प्राण्यांना वाचण्यासाठी पुढे आले आहेत. शहरातील नेचर कंजर्वेशन फोरम या प्राणीमित्र संस्थेकडून लॉकडाऊन  काळात विविध वन्यप्राण्यांना जीवदान देण्यात आले आहे. यात विविध प्रकारचे साप,  पक्षी व वन्य प्राण्यांचा समावेश आहे.      गेल्या तीन महिन्यांपासून शहरासह तालुक्यातील प्राणीमित्र दिवस-रात्र प्राण्यांसाठी काम करीत आहेत़ या काळात नेचर कंजर्वेशन फोरमचे योगेश वारुडे, प्रदीप जाधव,  राहुल कुंभार, महेश करंकाळ, गिरीश सोनवणे, अभिजीत पाटील आदी प्राणी मित्रांनी धामण, दिवड, नाग, गवत्या तस्कर, मांजऱ्या, घोणस आधी विषारी व बिनविषारी प्रकारचे तब्बल ७२ साप सुरक्षित  पकडून निसर्गात सोडले आहेत. तसेच मानववस्तीत  आढळलेले २ कासव,  २ घोरपड वाचवले आहेत.उन्हामुळे अशक्त झालेले खंड्या, बुलबुल,  गायबगळा व कोकीळ आदी पक्षांना व कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका काळवीटाला या प्राणीमित्रांनी जीवदान दिलेले आहे. तसेच लॉकडाऊन  काळामध्ये शांतता असल्यामुळे करवंद व टेंबे गावानजीक हिंस्र  वन्यप्राण्यांचा वावर आढळला होता़ त्यावेळी वनविभागासोबत नेचर कंजर्वेशन फोरमच्या प्राणी मित्रांनी गावागावात जाऊन प्रबोधन केले. तसेच पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ६ मांडूळ साप मिळाले़ त्या जप्त केलेल्या मांडूळांची संस्थेच्या प्राणीमित्रांनी २ दिवस काळजी घेऊन पोलिसांसमक्ष निसर्ग सान्निध्यात सोडले. लॉकडाऊनच्या काळात  तालुक्यात संस्थेच्या प्राणी मित्रांनी किती प्राणी रस्ता अपघातात मरण पावतात याच्याही नोंदी घेतल्या. यात १७ साप, २ पक्षी, १ उदमांजर मृत्युमुखी पडलेले आढळले. नेचर कंजर्वेशन फोरमचे शिंदखेडा तालुक्यातील प्राणीमित्र राहुल गिरासे, हर्षल सिसोदिया, यशपाल राजपूत,  प्रतीक चौधरी आदींना सहसा न आढळणारे चित्रांग नायकूळ व  स्मूथ स्नेक हे साप तसेच एक जखमी पोपट  आढळून आला. शिंदखेडा वनपरिक्षेत्रात एक चिंकारा हरीण रस्ता अपघातात मरण पावले असून एका काळविटाला वाचवण्यात यश आले आहे.   या सर्व कामात प्राणी मित्रांना वनविभागाचे तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी उमेश बारी  यांचे सहकार्य लाभत आहे. अशा कठीण  काळात जीवावर उदार होऊन प्राणी मित्रांनी केलेल्या नि:स्वार्थ सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे