शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डांगशिरवाडेजवळ दुचाकीस्वाराची बिबट्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 20:27 IST

साक्री तालुका। धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार गावाकडे पळाल्याने बचावला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : डांगशिरवाडे येथील जगदिश अहिरे हा दुचाकीस्वार शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने येत असतांना गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ अचानक बिबटया समोर आल्याने तो दुचाकीसह त्याच्यावर धडकला. मोटारसायकलीसह तो रस्त्याच्या बाजुला पडला. तेथून उठवून तो गावाकडे पळत सुटल्याने तो बचावला.डांगशिरवाडे गावातील जगदिश अहिरे या तरुणाचा लॉकडाऊनमुळे रिक्शा चालविण्याचा व्यवसाय बंद झाल्याने सध्या तो दुचाकीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बोपखेल-विजयपूर परिसरातून भाजीपाला विक्री करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास तो गावाकडे परतत असताना गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ त्याच्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आला. त्यामुळे त्याची दुचाकी बिबटयाला धडकली. त्यानंतर दुचाकी रस्त्यावरुन घसरली. भेदरलेल्या अवस्थेत जगदिशने दुचाकी तिथेच सोडून गावाकडे पळ काढला. गावाच्या पुलावर गावातील जगन सोनवणे, उमेश सोनवणे व कृषिकांत सोनवणे यांनी त्याला धीर दिला. नंतर जगन सोनवणे व कृषिकांत सोनवणे यांनी आपल्या कारने रावसाहेब सोनवणे, मुकेश सोनवणे व रविंद्र सोनवणे यांना सोबत घेऊन घटना स्थळावरुन जगदीशची दुचाकीला व जगदिशला घरी पोहोचवले.गावाकडे जोरात पळत आल्याने जगदीशचा श्वास कोंडला गेल्याने काही काळ त्याची तब्येत नाजूक झाली होती पण नंतर त्याच्यावर उपचा केल्याने तो पूर्वपदावर आला. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत व तो बाजूच्या मक्याच्या शेतात पळाला असल्याची शक्यता आहे.ही घटना घडण्याच्या काही वेळेपूर्वी तेथून एका जीपमधून बोपखेलकडे जाणाऱ्या तरुणांनी त्याठिकाणी रस्त्याच्याकडेला बिबट्या उभा असल्याचे पाहिले होते. त्यांनी जगदीशला बिबट्याच्या दिशेने जातांना पाहून आपली गाडी परत फिरवली होती पण ते पोहोचल्या आधीच जगदीशच्या दुचाकीने बिबट्याला धडक दिली आणि तो गावाकडे पळाल्याची घटना घडल्याचे जीपमधील तरुणांनी सांगितले.