शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रकवर आदळल्याने अपघात, पती ठार, पत्नी व मुलगा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:22 IST

फागण्याजवळील घटनेनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली

धुळे : फागण्याकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीचे पुढील चाक निखळल्याने तोल सुटल्याने दुचाकीस्वार समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची ही घटना नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील फागणे गावात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.एमपी ४६ एमआर ४६९५ क्रमांकाची दुचाकीवरुन पती-पत्नी व मुलगा असे तीन जण फागणे गावाकडून धुळ्याच्या दिशेने येत होते. पुढे ते मध्यप्रदेशाकडे जात असताना नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ दुचाकीचे पुढील चाक निखळले. त्यामुळे वेगात असलेल्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्याचवेळेस धुळ्याकडून जळगावच्या दिशेने जाणारा एमएच १८ बीजी ४०२० क्रमांकाच्या ट्रकवर दुचाकी जावून आदळली. दुचाकीवरील चालक धिरज झजाज्या पावरा (२५, रा.सेंधवा, मध्यप्रदेश) हा ट्रकवर आदळल्याने त्याच्या डोक्याला ट्रकचा लोखंडी भाग लागला आणि त्यानंतर तो जमिनीवर फेकला गेल्याने पुन्हा त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या धिरजचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्याचे लक्षात येताच या भागातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृत व्यक्तीला रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. धिरज याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर त्याची पत्नी आणि मुलावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने आपले वाहन थोडे पुढे नेवून पेट्रोल पंपाजवळ लावले. यावेळेस दोन्ही बाजुंची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. महामार्ग पोलीस आणि धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Dhuleधुळे