Two killed in accident | अक्कलपाडानजीक अपघातात दोन ठार 
अक्कलपाडानजीक अपघातात दोन ठार 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सुरत-नागपूर महामार्गावर धुळे तालुक्यातील अक्कलपाडा गावानजिक कार आणि दुचाकी यांच्यात शनिवारी दुपारी धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच तर दुसºयाचा रुग्णालयात मृत्यू झाला़ 
सुरुवाताला मृतांची ओळख पटलेली नव्हती़ अपघाताची माहिती वाºयासारखी पसरल्यानंतर कन्हैय्या युवराज सोनवणे आणि भगवान दगडू सोनवणे (दोन्ही रा़ छडवेल पखरुण ता़ साक्री) अशी मयत झालेल्या दोघांची नावे असल्याचे समोर आले़ 
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अक्कलपाडा धरणाजवळील वळण रस्त्यावर डीएन ०९ क्यू ३७३१ क्रमांकाची कार सुरत येथून धुळ्याकडे येत होती़ त्याचवेळेस स्पोर्ट बाईकवर दोन जण धुळ्याकडून साक्रीकडे जात होते़ दुपारी २ वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकी एकमेकांना धडकल्याने जोरदार अपघात झाला़ या अपघातात जबर मार लागल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू ओढवला़ तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला होता़ अपघाताच्या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली होती़ अपघातातील जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते़ 
याठिकाणी उपचार सुरु असताना दुसºयाचा मृत्यू ओढवला़ दुचाकी ही विना नंबरची असल्यामुळे मृतांची ओळख पटलेली नव्हती़ घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ सायंकाळी उशिराने ओळख झाली होती़ 

Web Title: Two killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.