सेंधवा येथील गँगस्टरच्या दोन साथीदारांना शिरपुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:31 IST2019-04-03T23:30:27+5:302019-04-03T23:31:37+5:30

मध्यप्रदेश पोलिसांची कारवाई : एक जण फरार, कार जप्त

 Two gangsters in Sandhwa are arrested in Shirpur | सेंधवा येथील गँगस्टरच्या दोन साथीदारांना शिरपुरात अटक

dhule

शिरपूर : शहरातील बालाजी नगरातील एका घरावर धाड टाकून मध्यप्रदेश पोलिसांच्या पथकाने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरात लपलेल्या फरार गँगस्टर संजय यादव यांच्या दोन साथीदारांना पकडले. मात्र एक जण फरार झाला आहे.
मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील गँगस्टर संजय यादव यांच्या घरावर मध्यप्रदेश पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकून १० पिस्तूल, १११ काडतुसे आणि १७ हाथगोले जप्त केले होते. मात्र या कारवाई आधीच संजय यादव तेथून फरार झाला होता. त्याचा शोध मध्यप्रदेश रविवारपासून घेत होती. संजय यादव व त्याच्या साथीदारांच्या मोबाईल लोकेशनद्वारे ते सर्व शिरपूर येथे लपल्याचे मध्यप्रदेश पोलिसांना समजले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी शिरपुर पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बालाजी नगरातील एका घरावर प्रचंड फौजफाटयासह धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पूर्ण घराला घेराव टाकला होता. त्याठिकाणी लपलेल्या दोन जणांना पोलिसांनी पकडले.

Web Title:  Two gangsters in Sandhwa are arrested in Shirpur

टॅग्स :Dhuleधुळे