दोन ट्रकांचा अपघात एक चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:23 IST2019-07-04T12:22:37+5:302019-07-04T12:23:07+5:30
चिमठाणे : क्रांती स्मारकासमोरील दुर्घटन

ट्रकांच्या अपघाताचे भीषण दृश्य .
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : दोंडाईचा-धुळे महामार्गावर दोन्ही ट्रकांची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला. त्यास धुळे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंकज पाटील, रा.कामपूर, ता.शिंदखेडा असे त्याचे नाव आहे.
दोंडाईचा येथून धुळ्याकडे जाणारा तसेच धुळ्याकडून दोंडाईचाकडे जाणारा ट्रक यांच्यात चिमठाणे येथील क्रांतीस्मारकासमोर समोरासमोर धडक झाली. रस्त्यावरच हा अपघात झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. रूग्णवाहिका बोलवून स्थानिक ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या चालकास धुळ ेयेथे पाठविले. त्याच्या डोक्यास व दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे.