दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

By अतुल जोशी | Updated: March 8, 2024 18:35 IST2024-03-08T18:35:31+5:302024-03-08T18:35:59+5:30

अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल

two died in two separate accidents | दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

अतुल जोशी, धुळे : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील प्रिंप्री फाट्याजवळून संतोष विठ्ठल वायाळ (वय ४५, रा.राजगुरुनगर, जि.पुणे) हे वेडसरपणात पायी जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात ७ मार्च, २४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघातात संतोष वायाळ जखमी झाल्याने, त्यांना कॉटेज रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी वैभव विठ्ठल वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मनोहर श्रीराम पाटील (रा.सौंदाणे, ता.धुळे) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात धुळे-चाळीसगाव रोडवरील मोहाडी हद्दीत २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी दगडू श्रीराम पाटील यांनी ७ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.

Web Title: two died in two separate accidents

टॅग्स :Accidentअपघात