दोन दुचाकी धडकल्या, महिला ठार; रावेर शिवारातील घटना, एकजण जखमी
By अतुल जोशी | Updated: October 22, 2023 17:56 IST2023-10-22T17:56:03+5:302023-10-22T17:56:14+5:30
समोर चालणाऱ्या दुचाकीस मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली.

दोन दुचाकी धडकल्या, महिला ठार; रावेर शिवारातील घटना, एकजण जखमी
धुळे: समोर चालणाऱ्या दुचाकीस मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात ३० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रावेर (ता.धुळे) गावाच्या शिवारात नंदाभवानी देवी रोड ते रावेर दरम्यान घडली. दीपाली चेतन अहिरे (रा. नेर,भटाईनगर, ता. धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे.
एमएच ३९-एएल७४०४ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने समोर चालणाऱ्या दुचाकीला (क्र.एमएच १८-बीबी ४०५५) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दीपाली चेतन अहिरे या महिलेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर चेतन भगवान अहिरे (वय ३८,रा. नेर) हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी चेतन अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवर एमएच ३९एल ७४०४ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहे.