भीषण! दोन दुचाकींची धडक; पिता-पुत्रासह तिघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:08 IST2025-03-06T20:08:24+5:302025-03-06T20:08:36+5:30
अपघातात पिता धनंजय आणि मुलगा आयुष यांच्यासह धडक देणारा अज्ञात दुचाकीस्वार हे तिघेही जागीच ठार झाले.

भीषण! दोन दुचाकींची धडक; पिता-पुत्रासह तिघांचा जागीच मृत्यू
धुळे : साक्री तालुक्यातील दिघावे ते प्रतापपूर दरम्यान दोन दुचाकींच्या धडकेत पिता-पुत्रासह ३ जण जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृतात वडील धनंजय जयवंत ठाकरे (३५), पाच वर्षीय मुलगा आयुष ठाकरे (दोघे रा. भोयाचा पाडा, पिंपळनेर, ता. साक्री) आणि एका अज्ञात दुचाकीस्वाराचा समावेश असून महिला जखमी आहे. याप्रकरणी अज्ञात मयत दुचाकीस्वाराविरुद्ध साक्री पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
खंडू बापू चौरे (वय ४३, रा. भोयाचा पाडा, ह.मु. प्रतापपूर, ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास त्यांचे जावई धनंजय ऊर्फ मुन्ना जयवंत ठाकरे व नातू आयुष धनंजय ठाकरे व मुलगी यशोदा धनंजय ठाकरे हे एमएच १८ एएच ४९४६ क्रमांकाच्या दुचाकीने दिघावे ते प्रतापपूर रस्त्याने आपल्या घरी भोयाचा पाडा येथे जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४१ बीएन ४६०७ या चाकीवरील चालकाने त्यांना धडक दिली. या अपघातात पिता धनंजय आणि मुलगा आयुष यांच्यासह धडक देणारा अज्ञात दुचाकीस्वार हे तिघेही जागीच ठार झाले, तर यशोदा ठाकरे जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराविरोधात साक्री पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.