शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अयोध्देतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी खासदार डॉ़ सुभाष भामरेंकडून अडीच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:41 PM

प्रत्येकाने या पवित्र कार्यात आपले योगदान द्यावे - आवाहन

धुळे - संपुर्ण देशाच्या अस्मीतेचे आणि श्रध्देचे प्रतिक असलेल्या भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर राम जन्मभुमि अयोध्या येथे उभारले जाणार आहे. मंदिर निर्माण राष्ट्र निर्माणाच्या या पवित्र कार्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या वतीने २ लाख ५१ हजाराचा निधी धनादेशाव्दारे दिला आहे.छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या भुमिपुजन सोहळ्यावेळी राम मंदिर निर्माणासाठी वैयक्तिक स्वरुपात योगदान देत अडीच लाख रुपये देण्याची घोषणा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी नुकतीच केली होती. त्यानुसार श्रीराम मंदिर नवनिर्माण निधी समर्पण समितीच्या पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या निवासस्थानी अडीच लाखाचा धनादेश सुपुर्द केला आहे.धनादेश स्विकारण्यासाठी निधी समर्पण संकलन समितीचे पदाधिकारी तथा राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रमुख परागजी, शरदजी, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंदक्रांत सोनार, उद्योजक जितेंद्र चवटीया, योगिराज मराठे, प्रशांत मोराणकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर उभे होणार असून प्रत्येक भारतीयाचे हे स्वप्न पुर्ण होणार असल्याने प्रत्येकाने या पवित्र कार्यात आपले योगदान द्यावे. असे आवाहन सुध्दा यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी केले.