नंदाळेशिवारात ट्रक उलटला, चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:36 IST2019-04-06T16:36:24+5:302019-04-06T16:36:52+5:30
नागपूर-सुरत : महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

नंदाळेशिवारात ट्रक उलटला, चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गुजरात राज्यातील राजकोट येथून जळगावकडे टाईल्स घेऊन जाणारा एमएच १८ एए ८८९३ क्रमांकाचा ट्रक खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात उलटल्याने त्या ट्रकचा चक्काचूर झाला़ ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात ट्रकखाली दबल्याने चालक लोटन मुरलीधर पाटील (२५, रा़ हनुमंतखेडे ता़ एरंडोल जि़ जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला़ घटनेचा माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ ट्रकखाली दाबला गेलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला़ यावेळी महामार्गावर टाईल्स विखरुन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली़