एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Updated: April 23, 2023 18:55 IST2023-04-23T18:55:26+5:302023-04-23T18:55:44+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षी बनावट चेसीस व इंजिन नंबर टाकून विक्री केलेले ३९ मालट्रक जप्त केलेले होते.

एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा
धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षी बनावट चेसीस व इंजिन नंबर टाकून विक्री केलेले ३९ मालट्रक जप्त केलेले होते. हे ट्रक पोलिस मुख्यालयातील मोकळ्या जागेत उभे करण्यात आले होते. या गुन्ह्याचा अद्याप तपास सुरू आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जप्त केलेल्या मालट्रक पैकी एका ट्रकला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. ट्रकला आग लागल्याचे कळताच पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती अग्निशमन विभागाला दिली.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने ट्रकला लागलेली आग पाण्याचा मारा करून आटोक्यात आणली. या आगीत ट्रकची कॅबीन जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या ट्रकचे पुढील चाक चोरीस गेल्याचेही निदर्शनास आले असून पोलिस याबाबत तपास करीत आहेत. या घटनेची नोंद करण्यात आली आहे.