सांगवीनजिक महामार्गावर आदिवासींचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:07 IST2018-08-06T13:03:23+5:302018-08-06T13:07:33+5:30

वाहन तोडफोड प्रकरण : पोलिसांचा बंदोबस्त 

The tribal people on the famous highway | सांगवीनजिक महामार्गावर आदिवासींचा रास्तारोको

सांगवीनजिक महामार्गावर आदिवासींचा रास्तारोको

ठळक मुद्देखासदारांच्या वाहनाची तोडफोडधुळ्यातील घटनेचे उमटले पडसादशिरपुरात मोर्चाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : धुळ्यात रविवारी घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेचे पडसाद शिरपूर तालुक्यात सोमवारी उमटले़ खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या वाहनावरील हल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी शिरपूर तालुक्यातील सांगवीनजिक राष्ट्रीय महामार्गावर सकाळी रास्तारोको आंदोलन छेडले़ आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर टायर देखील जाळले़ अचानक झालेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक खोळंबली होती़ वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या़ यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे़ दुपारुन शिरपूर येथे या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले आहे़ 

Web Title: The tribal people on the famous highway