अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:30+5:302021-05-21T04:38:30+5:30
बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जातोडा गावाजवळ महसूल पथकाने ...

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जातोडा गावाजवळ महसूल पथकाने कार्यवाही करीत ताब्यात घेतले़ ते ट्रॅक्टर दंडात्मक कार्यवाहीसाठी उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आले आहे. जातोडा वनावल शिवारातील तापी नदीपात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक करीत असताना काहीजण आढळून आले.
मंडळ अधिकारी प्रशांत ढोले यांनी त्यास थांबवून चौकशी केली़. मात्र, वाळूउपसा करणाऱ्यांकडे कुठलाही परवाना नव्हता. ही कारवाई तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश आढारी, मंडळ अधिकारी प्रशांत ढोले, संजय जगताप, तलाठी पंकज महाले, पृथ्वीराज गिरासे, अमृतसिंग राजपूत, रेणुका राजपूत, भूषण चौधरी, दिनेश गुशिंगे, एहतेशाम शेख, पवन कोळी, सतीश पाटोळे यांच्या पथकाने केली.