धुळ्यामध्ये जातोडा येथे शाळेसमोर उभे केलेेले ट्रॅक्टर चोरून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 17:05 IST2023-04-06T17:04:16+5:302023-04-06T17:05:57+5:30

अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चोरून नेले. सर्वत्र शोध घेऊनही तपास लागला नाही़ ३ लाख रुपये किमतीचे ते ट्रॅक्टर होते.

tractor parked in front of a school at Jatoda in Dhule was stolen | धुळ्यामध्ये जातोडा येथे शाळेसमोर उभे केलेेले ट्रॅक्टर चोरून नेले

धुळ्यामध्ये जातोडा येथे शाळेसमोर उभे केलेेले ट्रॅक्टर चोरून नेले

शिरपूर जि.धुळे : तालुक्यातील जातोडा येथून अज्ञात चोरट्याने ३ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्याची घटना घडली.

२९ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास ट्रॅक्टर चालक दयाराम गुलाब भिल (रा.जातोडा) यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसमोर ट्रॅक्टर (क्रमांक एमएच१९-डीव्ही-०२१८) उभे केले होते. अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चोरून नेले. सर्वत्र शोध घेऊनही तपास लागला नाही़ ३ लाख रुपये किमतीचे ते ट्रॅक्टर होते.

याबाबत ट्रॅक्टरमालक मुकेश गोपीचंद पाटील (रा. शिंगावे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास हवालदार पवन ईशी हे करीत आहेत.

Web Title: tractor parked in front of a school at Jatoda in Dhule was stolen