साक्री तालुक्यात रेशन दुकानदारास लुबाडणाºया तोतया अधिकाºयासह तिघांना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:55 IST2018-02-23T12:54:33+5:302018-02-23T12:55:25+5:30
दोघे पोलिसांच्या ताब्यात

साक्री तालुक्यात रेशन दुकानदारास लुबाडणाºया तोतया अधिकाºयासह तिघांना चोप
आॅनलाइन लोकमत
साक्री, जि. धुळे, दि. २३ - तालुक्यातील भोणगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे असल्याची बतावणी करुन रेशन दुकानदारकडून पैशाची मागणी करणा-या तिघांना चांगलाच चोप देण्यात आला. यातील एक जण फरार झाला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भोणगाव येथे दिनेश बोरसे रेशन दुकानदारांकडे शुक्रवारी सकाळी तीन जण आले व आपण लालुचपत अधिकारी असल्याचे सांगितले. यात त्यांनी पैशाचीही मागणी केल्याचे समजते. याबाबत बोरसे यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधला असता अधिकारी तोतया असल्याचे समजले. त्यानंतर तिघांना रेशन दुकानदारांनी चोप दिला. यातील एक जण फार झाला. दोन जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तोतया अधिकारी नवापूर तालुक्यातील असल्याचे समजते. या तिघांकडे अलिशान चार चाकीदेखील होती.