खळबळजनक! 'ते' बाईकने आले, विष प्यायले, आत्महत्येसाठी पुलावरून झेपावले; ग्रामस्थांना आढळली पिशवी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 07:57 PM2021-07-22T19:57:20+5:302021-07-22T19:59:37+5:30

तिघांनी पुलावरून नदीत उडी घेतल्याचा दावा; पोलिसांकडून शोध सुरू

three dives in river from bridge in dhule police begin search | खळबळजनक! 'ते' बाईकने आले, विष प्यायले, आत्महत्येसाठी पुलावरून झेपावले; ग्रामस्थांना आढळली पिशवी

खळबळजनक! 'ते' बाईकने आले, विष प्यायले, आत्महत्येसाठी पुलावरून झेपावले; ग्रामस्थांना आढळली पिशवी

Next

शिरपूर- गिधाडे तापी नदीपुलावरुन तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मात्र आत्महत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. याबद्दल पोलिसांकडे विचारणा केली असता दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पुलावरून तिघांनी उडी घेतल्याचं प्रत्यक्षदर्शींनी लोकमतच्या प्रतिनिधींना सांगितलं.

शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावरुन तीन जणांनी आत्महत्या केल्याचे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पुलावर एक मोटारसायकल आढळून आली आहे. त्यात एका पुरुषाच्या व महिलेच्या चप्पला, विषारी औषधाची बाटली आढळून आली आहे. मात्र आत्महत्या कोणी केली याबाबत समजू शकलेले नाही. मात्र तापी पुलावर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याबाबत अद्याप कुठलीही ठोस माहिती प्राप्त झालेली नाही. घटनास्थळी शिंदखेडा पोलीस पथक दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: three dives in river from bridge in dhule police begin search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app