धुळे : साक्री तालुक्यातील धमणार येथे शेतीच्या वादातून १९ जून रोजी मारहाणीत सुभाष भिवसन वाघ याचा खून झाला होता़ त्या घटनेपासून आरोपी हे पोलीस दप्तरी फरार असलेतरी त्यांच्याकडून रात्री-अपरात्री घरी येऊन जीवंत जाळण्याची धमकी दिली जात आहे़ अशी कैफियत त्या मुलाची आई सुमनबाई वाघ यांनी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे मांडली़शेतीच्या वादातून साक्री तालुक्यातील धमणार येथे सुभाष भिवसन वाघ या तरुणाचा खून खिवराज धर्मा वाघ, सागर खिवराज वाघ, मच्छिंद्र राजेंद्र निकम, राजेंद्र मंगा निकम, कमलाकर राजेंद्र वाघ यांनी कुºहाडीने घाव घालून जीवे ठार मारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे़ या गुन्ह्यातील संशयित आरोपी मच्छिंद्र निकम, राजेंद्र निकम, कमलाकर वाघ हे फरार आहेत़ खुनाच्या घटनेला आता महिना उलटला़ तरी अद्याप पोलिसांनी या फरार आरोपींना अटक केलेली नाही़ परिणामी ते रात्री-अपरात्री घरी येऊन जीवंत जाळण्याची धमकी देतात़ यामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे़ आजमितीला घरात माझ्यासह सून, नात, नातजावाई आणि त्यांची तीन मुले राहत असून लग्न झालेली नात व जावाई हे देखील येणार आहेत़ परिणमी त्या सर्वांच्याच जीवाला धोका निर्माण झालेला आहे़जे संशयित आरोपी आम्हाला येऊन धमकी देतात ते साक्री पोलिसांना सापडत नाहीत हे अजब आहे़ डोक्याबरोबरचा मुलगा गमावला, आता इतरांनाही गमवायचे का? असा सवाल करीत वृध्द महिला सुमनबाई भिवसन वाघ यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे कैफियत मांडली़ आरोपींना पकडण्याची मागणी देखील केली़
फरार असलेल्या आरोपींकडून जीवंत जाळण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:58 IST