एलसीबीने पकडल्या चोरीच्या बुलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:19 IST2018-08-31T13:18:02+5:302018-08-31T13:19:36+5:30
धुळे पोलीस : दोन संशयित ताब्यात

एलसीबीने पकडल्या चोरीच्या बुलेट
ठळक मुद्देबुलेट चोरटे एलसीबीच्या ताब्यातसहा बुलेट केल्या हस्तगतपोलिसांचा तपास सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चोरीला गेलेल्या सहा बुलेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत़ याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरुआहे़
शहरासह जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे़ चोरट्यांचा तपास सुरु असताना पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी व त्यांच्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना पकडले आहे़ प्राथमिक चौकशीतून ६ बुलेट त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत़ चोरट्यांनी कुठून बुलेट चोरल्या होत्या, याचा तपास पथक करीत आहेत़