शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख; धुळ्यात तरुणाची हत्या करणारा कसा सापडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:19 IST

धुळे जिल्ह्यातील एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. शरीरावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली आणि त्याने आत्महत्या केली नसल्याचेही शवविच्छेदन अहवालातून समोर आले. 

Dhule Crime: धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या रवी मालचे याने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून महिलेच्या पतीनेच प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासातून ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

२६ मार्च रोजी दिवाणमळा येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका विहिरीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यात गेला होता. 

हत्या केल्याचे कसे आले समोर?

उत्तरीय तपासणीत मृतदेहाच्या डोक्यावर आणि शरीरावर खोलवर जखमा असल्याचे समोर आल्याने घातपाताचा संशय बळावला. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

मयताच्या शरीरावर टॅटू आणि वर्णनावरून तो मृतदेह गावातीलच रवी यशवंत मालचे याचा असल्याची ओळख पटली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गावातील एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयिताने पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.

रवीचे आरोपीच्या पत्नीसोबत होते संबंध

मयत रवी याचे आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्च रोजी रात्री आरोपीने रवीला एका निर्जनस्थळी नेले. तिथे दारूच्या नशेत असताना त्याने रवीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने जखमी रवीला सायकलवर टाकून एमआयडीसीच्या मागील विहिरीत फेकून दिले होते. या प्रकरणी मयत रवीचा भाऊ परमेश्वर मालचे याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhule: Man Kills Lover of Wife, Throws Body in Well

Web Summary : In Dhule, a man murdered his wife's lover, Ravi Malche, by crushing his head with a stone due to an affair. He then disposed of the body in a well near MIDC. Police investigations revealed the crime, leading to the arrest of the accused.
टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारArrestअटकPoliceपोलिस