तहसीलदारांनी निराधार वृद्धेला केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:41+5:302021-06-03T04:25:41+5:30

तहसीलदार महाजन यांनी एका निराधार वृद्धेचे रेशनकार्ड तयार करून तिला मोफत धान्याचा लाभ मिळून दिला. त्यामुळे साहजिकच त्या वृद्धेच्या ...

Tehsildar helped the destitute old man | तहसीलदारांनी निराधार वृद्धेला केली मदत

तहसीलदारांनी निराधार वृद्धेला केली मदत

तहसीलदार महाजन यांनी एका निराधार वृद्धेचे रेशनकार्ड तयार करून तिला मोफत धान्याचा लाभ मिळून दिला. त्यामुळे साहजिकच त्या वृद्धेच्या तोंडून निघाले साहेब.., तुमचे भले हो..! या आशीर्वादाने अधिकाऱ्यांसह उपस्थितही भारावले होेते.

तहसीलदार आबा महाजन हे नेहमीच तालुक्यातील भागांमध्ये भ्रमण करत असतात. ते कोविडस्थितीचा आढावा घेत फिरत असताना शहरातील अरुणावती नदीकिनारी असलेल्या खंडेराव मंदिराजवळ गाडी थांबून सहज पडक्या घरात डोकावून पाहिलं. तेथे एक आजी राहत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी सहज चौकशी केली तेव्हा दोन लोकांच्या कुटुंबात आजीचे पती प्रभाकर भावसार यांचे नुकतेच निधन झाल्याचे आजीने सांगितले. तहसीलदारांनी उदरनिवार्हाचे आता पुढे काय अशी विचारणा केली असता, घरात धान्य नसल्याचे आजीने सांगितले. तेव्हा प्रधानमंत्री गरीब कुटुंब योजनेत रेशन दुकानावर धान्य मोफत मिळत असल्याचे आजींना सांगितले. परंतु आजींकडे रेशन कार्ड नसल्याने ती हतबल असल्याचे लक्षात येताच तहसीलदारांनी कार्यालय गाठले आणि आजीचे रेशन कार्ड तयार करून व महिना पुरेल इतका किराणा घेऊन ते स्वत: व पुरवठा अधिकारी मयानंद भामरे यांच्या समवेत आजीच्या घरी पोहोचले. रेशन कार्डसह किराणा मिळाल्याने आजीला अत्यानंद झाला.

आजीसुद्धा साहेब, तुमचं कल्याण होवो! हा आशीर्वाद द्यायला विसरली नाही. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू टेलर उपस्थित होते.

Web Title: Tehsildar helped the destitute old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.