शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

उन्हाची झळ, धरणे गाठतायत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:05 IST

शिरपूर : करवंद धरणातही अल्पसा साठा, १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

शिरपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत़ परिणामी आदिवासी भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील १३ पैकी १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे़ संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणात २० टक्के पाणी साठा असल्यामुळे शहरवासियांचे पाणीविना हाल होवू नये म्हणून शिरपूर नगरपालिकेने यापूर्वीच उपाययोजना करून ठेवल्या आहेत़ असे असतांना शहरात निजर्तुंक पिण्याचे पाणी पुरविले जात आहे़शिरपूर तालुक्यात २ मध्यम प्रकल्पासह १३ लघु प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आहे़ शिरपूर पॅटर्न व जलयुक्तमुळे गावे बहरली तर शिवारं हिरवीगार झाली़गत पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु काही बंधारे कमी-अधिक पाऊसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधाºयात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर ते आटलीत़ गेल्या वर्षी पावसाने सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला मात्र नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच धरणे-बंधारे कोरडी झाली आहेत़सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ आदिवासी पाड्यांवर तर २-४ किमीपर्यंत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे़ काही पाड्यांवर तर पाण्याच्या भटकंतीसाठी मुल-मुली शाळेला दांडी मारत आहेत तर काहींनी शाळेला कायमचा बाय दिला आहे़आतापर्यंत तालुक्यात एकही गावात टँकर नाही़ प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना दिलासा देवून उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत़ अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आलेली आहे़ त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे़ लवकरच या गावांमध्ये पाणी टंचाई दूर केली जाणार आहे़ प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी केली जात आहे़एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असतांना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे़ करवंद व अनेर मध्ये प्रकल्पातच बºयापैकी पाण्याचा साठा आहे़ त्यापैकी करवंद धरणाचे पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे़आजमितीस या धरणात ३़३४ दशघमी म्हणजेच २०़६५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यात शिरपूर नगरपालिकेने २़८३ दशघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे, तसेच करवंद येथील मका फॅक्टरीने सुध्दा पाणी आरक्षित केले आहे़ याशिवाय या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ त्यामुळे या धरणातील पाणीसाठी मे अखेरपर्यंत संपण्याची शक्यता नाकारता येत नाही़ २०१३ मध्ये हवाई सर्व्हेक्षण होवून या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याचे समोर आले आहे़ धरण बांधतेवेळी या धरणाची पाणीसाठा क्षमता ५० दशघमी एवढी होती़ मात्र २०१३ च्या सर्व्हेक्षणापर्यंत पाणीसाठा क्षमता १८़२६ दशघमी इतका राहीला़ शहरात संभाव्य पाणी टंचाई भासवू नये म्हणून नगरपालिकेने आधीच शहरातील सर्वच पाणी टाक्यांवर टयुबवेल केल्या आहेत़ फिल्टरशन प्लॅन येथे सुध्दा टयुबवेल व तापी फिल्टर प्लॅन सुरु केले.१० प्रकल्पात ठणठणाटतालुक्यातील करवंद धरणात २०.६५ टक्के, अनेर ५४.३३, अभणपूर ४०, नांदर्डे ६ आणि गधडदेव धरणात ८ टक्के जलसाठा आहे.तर लौकी, खामखेडा, जळोद, कालीकराड, वाडी, मिटगांव, बुडकी, रोहिणी, विखरण आणि वकवाड धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

टॅग्स :Dhuleधुळे