लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर जवळ असलेल्या चुडाणे गावातील अमृत कोळी (३७) या तरुण शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी घडली़ सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ अकस्मात मृत्यूची नोंद शिंदखेडा पोलीस स्टेशनला करण्यात आली़ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावाजवळील चुडाणे येथील अमृत हावदास कोळी (३७) या शेतक-याने दोंडाईचा येथे जावून रेल्वे रुळावरील अमरावती नदीवरील पुलाजवळ जावून आपले जीवन संपविल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ त्यांच्यावर मालपूर येथील सेंट्रल बँकेचे ४ ते ५ लाख रुपयांचे कर्ज होते़ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाख रुपये माफ झाले होते़ मात्र] उर्वरीत रक्कम भरण्यासाठी तगादा लावल्यामुळे त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्याचे भाऊ रमेश हावदास कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ ही दुर्घटना सोमवारी दुपारी घडली़ या अपघातामुळे अमृत कोळी यांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या़ त्यांच्या हातावर गोंदलेले असल्याने आणि कपड्यावरुन त्यांची ओळख पटविण्यात आली होती़ त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे़
शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे येथील शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:33 IST
कर्जबाजारीपणा : गावात व्यक्त होतेय हळहळ
शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे येथील शेतक-याची आत्महत्या
ठळक मुद्देचुडाणेतील शेतक-याची आत्महत्याकर्जबाजारीपणाला कंटाळला होताअंत्यसंस्कारावेळी व्यक्त झाली हळहळ