आवडता विषय निवडल्यास विद्यार्थी आनंदी दिसतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:39 IST2020-03-19T12:38:55+5:302020-03-19T12:39:24+5:30
प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे : सी.गो. पाटील महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : कोणत्याही विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असतांना आपल्या आवडीचा विषय निवडला तर वर्षभर विद्यार्थी आनंदी दिसत असतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी केले.
साक्री येथील सी.गो.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान प्राणिशास्त्र विषयाचा निरोप समारंभ सोमवार १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. आर.आर.अहिरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.लहू पवार, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.एस.एस. पाटोळे, डॉ.एन.एच. आहेर, प्रा.एम.एच. शेख, डॉ.प्रदीप राठोड, प्रा.विलास पावरा यांच्यासह प्राध्यापक व प्राणिशास्त्र विभागातील स्पेशल विषयाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्राचार्य डॉ.अहिरे पुढे म्हणाले की दैनंदिन अभ्यासासोबत तुमचे वागणे कसे आहे याची टिप्पणी समाज करत असतो. त्यावरून महाविद्यालयातील व तुमच्या घरातील संस्कारांची चर्चा अवती-भोवती होत असते. म्हणून ज्ञानासह भविष्यात तुमच्या संसारात रममाण होणार तेव्हा चांगल्या आचार विचार आणि संस्काराचे जतन करण्याचा प्रयत्न करा.
याप्रसंगी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.लहू पवार, प्राध्यापक शत्रुघ्न पाटोळे,प्रा.शेख, डॉ.प्रदीप राठोड आदींनी निरोप समारंभाविषयी मनोगत व्यक्त केले.
टी.वाय. बी.एस्सी. प्राणिशास्त्र विभागातील कृतिका गायकवाड, स्नेहल पवार,पूनम अहिरराव, अश्विनी जाधव या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्रवेशापासून आजपर्यंत आम्ही कसे घडलो याविषयीचे अनुभव सांगितले.
सूत्रसंचालन कृतिका गायकवाड व अश्विनी जाधव यांनी तर आभार प्रियांका सूर्यवंशी हिने मानले. यावेळी वर्षभरातील प्राणिशास्त्र विभागातील अभ्यासविषयक उपक्रमांविषयी स्लाईड शोद्वारे क्षणचित्रे दाखविण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर जाधव,उमेश वसईकर आदींनी परिश्रम घेतले.