आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आर्थिक उलाढाल ठप्प झालेली होती. नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झालेला होता. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त दंडाचा व शास्तीचा भार येऊ नये, यासाठी मालमत्ता करावर सवलत देण्याचा निर्णय मनपाकडून घेण्यात आला आहे.
१ ते १५ जानेवारी या कालावधीत थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. १ ते ५ जानेवारी दरम्यान एकूण १ कोटी २० लाख ८६ हजार ३६९ रुपये भरणा प्राप्त झाल्यावर त्यातून २७ लाख २६ हजार ६३३ रुपये शास्तीमाफी दिली आहे. तर पाच दिवसांत १ कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता.
शनिवारी सुटीच्या दिवशी गर्दी
१५ जानेवारीपर्यंत मालमत्ता करावर शंभर टक्के सवलत असल्याने शनिवारी नागरिकांच्या मनपात रांगा लागल्या होत्या. दरम्यान, शनिवारी दिवसभरात २७५ मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा लाभ देण्यात आला. तर १९७ जणांनी राेख १ काेटी ३२ हजार ९६७ रुपयांचा मालमत्ता कराचा भरला केला होता. त्यांना ६ लाख ३३ हजार ६९५ रुपये शास्ती माफ झाली. ३० मालमत्ताधारकांनी चेकद्वारे ३ लाख ६८ हजार ८२७ रुपये भरले होते. त्यांना ४७ हजार ६५५ रुपयांची शास्ती माफ झाली.
४८ जणांनी केला ऑनलाइन भरणा
शहराबाहेर कामानिमित्त स्थलांतर झालेल्या व अन्य अशा ४८ जणांनी ऑनलाइन मोबाइल ॲपच्या माध्यमातून २ लाख ८९ हजार २४४ रुपयांचा कर भरला. अशा ४८ जणांना ८१ हजार ९२३ रुपयांची शास्तीमाफीचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.