मास्क न लावणाऱ्यांवर होईल कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST2021-02-21T05:07:40+5:302021-02-21T05:07:40+5:30
प्रश्न: कोरोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणते प्रयत्न होत आहे. उत्त्तर : जिल्हा कोरोनामुक्त राहावा, बाधितांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी ...

मास्क न लावणाऱ्यांवर होईल कठोर कारवाई
प्रश्न: कोरोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणते प्रयत्न होत आहे.
उत्त्तर : जिल्हा कोरोनामुक्त राहावा, बाधितांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह, महापालिका, आरोग्य व पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या काळात मास्कचा वापर न करणाऱ्यांना २०० रुपये दंड लागू करण्यात आला आहे. त्यासाठी मनपाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरराेज मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
प्रश्न: लग्नासाठी किती जणांना परवानगी देण्यात आली आहे.
उत्त्तर : विवाह सोहळा, अंत्यविधी व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मनपाच्या पथकाकडून मंगल कार्यालयात पाहणी केली जाणार आहे.
प्रश्न: कोरोना चाचणीसाठी काय नियोजन करण्यात आले आहे.
उत्त्तर : शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठा, मोठे संस्थाचालक, दुकानदार यांची रॅपिड टेस्ट करणे, कॉन्टक्ट ट्रेसिंगची संख्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील भीती न बाळगता कोरोना चाचणी स्वत:हून करून घ्यावी.
प्रश्न: सार्वजनिक ठिकाणी काय निर्बंध लावण्यात आले आहे.
उत्त्तर : काही महिन्यांपासून नागरिकांनी हाॅटेल, दुकाने, सार्वजनिक उद्याने सकाळी ५ ते सकाळी ९ यावेळेत व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले राहतील. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई होईल.
अन्यथा गुन्हा दाखल होईल
सर्दी, फ्लू व तत्सम आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट केली जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गर्दी करण्यास मनाई
आग्रारोड, देवपुरातील भाजीबाजार, पारोळा रोड, कराचीवाला खुटंसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. सध्या ही गर्दी सर्व सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी भाजी बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी कोरोना तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
कोरोना संपला, लस बाजारात आली म्हणून विनामास्क लावणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र मास्क व सॅनिटराझरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तीन महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत मोठी वाढ झाल्याने त्याठिकाणी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला आहे. आपले शहर लाॅकडाऊन होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.