शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

धुळ्यात वाहनांवरील दगडफेकीमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:38 IST

साक्री रोडवरील घटना : २५ जणांच्या टोळक्याचे कृत्य, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील सिंचन भवनाजवळ एका रसवंती चालकाला दमदाटी, मारहाणसह तोडफोड केल्यानंतर रस्त्यावरुन जाणारी बस, रिक्षा व कारच्या काचा फोडण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली़ २० ते २५ जणांच्या टोळक्याने हे कृत्य केल्यामुळे बराचवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ शहर पोलिसांचे पथक येताच टोळके पसार झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला़ शहरातील साक्री रोडवरील सिंचन भवनाजवळ देविदास चौधरी यांचे आऱ के़ रसवंती नावाचे दुकान आहे़ याठिकाणी भरत पाटील हा रसवंतीवर ऊसाची साफसफाई करत असताना २० ते २५ जणांचे टोळके जिल्हाधिकाºयांचा जमावबंदीचा आदेश असतानाही एकत्रित आले़ रसवंतीच्या दुकानावर येऊन रसवंती बंद कर, येथे आमचेच राज्य आहे़ बाहेरचा कोणीच येऊन येथे राज्य करु शकत नाही, असे म्हणत सामान अस्ताव्यस्त करत फेकून देण्यास सुरुवात करण्यात आली़ काचेचे ग्लास, ट्युबलाईट फोडून दुकानातील  गल्ल्याचा ड्रॉव्हर काढून तोडफोड करण्यास सुरुवात केली़ ऊसाच्या टिपºयाने मारहाण देखील केली़ हे टोळके एवढ्यावरच न थांबता त्याचवेळेस कुमारनगराकडून येणारी एमएच १८ एपी ०६३३, जीजे १८ झेड ३६८६ क्रमांकाची बस, एमएच १८ एजे ८६५२ क्रमांकाची कार अशा या तीन वाहनांचे नुकसान केले़ दगडफेक केल्याने वाहनांचे काच फुटले़ या तोडफोडीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ आरडाओरड करत धिंगाणा घातल्यामुळे साक्री रोड भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ शहर पोलिसांचे पथक येताच टोळके घटनास्थळावरुन पसार झाले आहे़ याप्रकरणी तेजस गोकूळ चौधरी (१८, रा़ जुने धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार अज्ञात २० ते २५ जणांविरुध्द भादंवि कलम ३०८, १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०, ११२ चे उल्लंघन ११७ व ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी