धुळे जिल्ह्यातील वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:15 IST2021-02-20T22:15:07+5:302021-02-20T22:15:15+5:30
बबनराव चौधरी : जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

धुळे जिल्ह्यातील वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवा
धुळे - धुळे जिल्हातील विज ग्राहकांना महावितरणकडुन कोणतीही पूर्वसूचना न देता कठोरपणे निर्णय घेत घरगुती, दुकानदारसह शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा एकतर्फी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे़ वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. व दुकानदार, घरगुती ग्राहक अडचणीत येतील म्हणून वीज कनेक्शन तोडणे थांबवावे अशी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी संजय यादव यांनी या विषयावर महावितरणचे अधिकऱ्यांशी संपर्क साधुन चर्चा केली. निवेदनाचा प्रत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात, एका ट्रांसफार्मरवरुन अनेक शेतकऱ्यांपर्यंत कनेक्शन असून अगोदरच अनियमित वीजपुरवठामुळे शेतकरी त्रस्त आहेत असे असतांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडी सरकार शेतकºयांना व जनतेला त्रास देत आहे. आपण ही बाब गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक असून शेतकºयांची व जनतेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
असे असतांना शेती पंपाचे कनेक्शन तोडणे हा पर्याय ठरु शकत नाही व जनतेकडे ही पैसे नाहीत़ वसुली करण्यासाठी गाव किंवा जिल्हा परिषद सर्कलस्तरावर मेळावे घेऊन शेतकºयांना व जनतेला विज बिल भरण्यासाठी आवाहन केले जाऊ शकते़
किमान कनेक्शन तोडणे अगोदर त्यांना नोटीसा दिली जाऊ शकते, असे न करता विजेचे कनेक्शन तोडण्याचा आदेश देणे म्हणजे हुकुमशाहीच आहे.
विज बिल माफ करु, १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ अशा प्रकारच्या अनेक वल्गना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते़ आता मात्र मोगलाई प्रमाणे वागत आहेत. कृषी पंपाचे, घरगुती व दुकानदाराचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय थांबवण्यात यावे असे भाजपाकडुन प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकार जरी वाईट प्रवृत्तीने वागत असेल तरी अधिकाºयांनी कोणत्याही परिस्थितीत पूर्वसूचना दिली पाहिजे तसेच विजेचे बिल भरण्यासाठी शेतकºयांना व जनतेला वेळ देण्यात यावे शेतकºयांनी व जनतेने बिल भरावे यासाठी प्रबोधन करावे़ परंतु आता शेतकºयांच्या विजेचे कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकरी उध्वस्त करणे होय म्हणून एकाही शेतकºयांचे तसेच दुकानदार व घरगुती वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये़ अन्यथा होणाºया परिणामांना महावितरण अधिकारी जबाबदार राहातील तरी याची आपण महावितरण अधिकाºयांना आपल्यास्तरावरुन सुचना द्यावेत़ भरमसाठ असलेले वीज बिलात सवलत द्यावी तसेच या गंभीर विषयाची राज्य शासनास कल्पना द्यावी असे भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.