धुळ्यातील नेहा मेडीकल दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:47 IST2018-10-12T11:45:56+5:302018-10-12T11:47:11+5:30

७० हजार लांबविले : देवपुरातील दत्तमंदिर भागातील घटना

Stealing in Neha Medical Store in Dhule | धुळ्यातील नेहा मेडीकल दुकानात चोरी

धुळ्यातील नेहा मेडीकल दुकानात चोरी

ठळक मुद्देदेवपुरात मेडीकल दुकान फोडलेदुकानातील ७० हजाराची रोकड लंपास 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील दत्त मंदिराजवळ असलेले नेहा मेडीकल दुकान फोडून रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ चोरट्याने ७० हजार रुपये लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे़ तपास पोलीस करीत आहेत़ 
देवपुरातील दत्त मंदिर परिसरात जयस्वाल नामक व्यक्तीचे नेहा मेडीकल दुकान आहे़ गुरुवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन ते घरी गेले़ चोरट्याने शुक्रवारी पहाटे या दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ गल्यात ठेवलेले ७० हजाराची रोकड लांबविली़ शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे दुकान मालकाच्या लक्षात आले़ घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळविण्यात आली असून पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत़ 

Web Title: Stealing in Neha Medical Store in Dhule