कुसुंब्यात स्टेट बँकेचे एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:12 IST2019-05-06T12:11:54+5:302019-05-06T12:12:24+5:30
पहाटेची घटना : पैसे गेल्याचे तपासणीतून होणार स्पष्ट

कुसुंब्यात स्टेट बँकेचे एटीएम फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़ मशिनमधून पैसे गेल्याचे बोलले जात असलेतरी मशीन तपासणीअंती स्पष्ट होणार असल्याचे समोर येत आहे़ एटीएम मशीन फोडल्याची आठवड्यात दुसरी घटना आहे़ हा प्रकार सकाळी उजेडात आला़ घटनेची माहिती धुळे तालुका पोलिसांना कळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत़ घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती़