शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार्टअप’ उपक्रम युवा उद्योजकांसाठी व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:22 IST

शिरपूर : आयएमआरडी परिसंस्थेत ‘यशस्वी उद्योजकता विकास’ कार्यशाळेत हर्षल विभांडीक

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : स्टार्टअप उपक्रम युवा उद्योजकांसाठी योग्य व्यासपीठ असून त्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासही साध्य होणार आहे. नवीन उद्योग सुरु करतांना येणारी आव्हाने आणि छोट्या शहरांमध्ये स्टार्टअप कंपन्यांचे भविष्य यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे़ या उपक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग वाढवावा, असे प्रतिपादन युनायटेड स्टेट्सचे एम.अ‍ॅण्ड ए. इंटरनॅशनल कॅपीटल पार्टनर्स एल.एल.सी.चे संचालक हर्षल विभांडीक यांनी केले़येथील आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय.एम.आर.डी. परिसंस्थेत ‘यशस्वी उद्योजकता विकास’ या विषयावर हर्षल विभांडीक, नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी दिपक ठाकणे, युवा उद्योजक योगेश मिरगे, रोहित मराठे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.सी.ए. विभाग प्रमुख प्रा.मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभाग प्रमुख डॉ.मनोज पटेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसाय सुरु करण्याचे कौशल्य आत्मसात करुन सरकारच्या विविध योजनांद्वारे स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.युवा उद्योजक दिपक ठाकणे यांनी महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रिनरशीप डेव्हल्पमेंट उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना व शासनाकडून मिळणाºया विविध अनुदानांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.परिसंस्थेचे माजी विद्यार्थी व युवा उद्योजक योगेश मिरगे यांनी त्यांच्या स्टार्टअप यशराज कंपनी शहादा या उद्योगाची वाटचाल व माहिती स्पष्ट केली. त्यात त्यांनी उद्योग उभारतानांचे अनुभव, आव्हाने आणि मार्ग या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील म्हणाल्या, व्यवस्थापन आत्मकेंद्री ठेवल्यास व्यवसायात झपाटयाने प्रगती साधता येते. तसेच सर्वांनी भविष्यातील संधीविषयी सजगता बाळगावी, असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.योगेश सेठिया, प्रा.सचिन सुराणा, प्रा.अमर गौर, प्रा.केदार आपटे, प्रा.महेश भावसार, प्रा.मानसी वैद्य, प्रा.प्रियंका भंडारी, प्रा.दिनेश बोरसे, प्रा.अमुल तांबोळी, प्रा.लक्ष्मीकांत शर्मा प्रा.सुफियान बागवान, प्रा.प्रियंका सैंदाणे, प्रा.स्नेहा सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे