भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू
By देवेंद्र पाठक | Updated: April 1, 2023 23:07 IST2023-04-01T23:07:06+5:302023-04-01T23:07:52+5:30
यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू
धुळे : चालकाचे नियंत्रण सुटले भरधाव दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील नगाव शिवारातील धमाणे फाट्याजवळ एमएच १८ बीएन ७०४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून दीपक खंडू पाटील (वय ३७) आणि दिलीप खंडू पाटील (वय ४२, दोघे रा. इंदिरानगर, वलवाडी, धुळे) हे दोघे येत होते. दुचाकी चालक दीपक पाटील याचा अचानक तोल गेल्याने त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली. यात दीपक पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागला, तर त्यांच्या भावाला हाताला दुखापत झाली. अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दोघाही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतानाच दीपक खंडू पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जखमी दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात पावणेपाच वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.