सोनगीरला पैशांच्या वादातून एकाला जीवंत जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:01 IST2020-01-18T16:01:33+5:302020-01-18T16:01:59+5:30

उपचारादरम्यान मृत्यू : गावात तणाव, तीन जणांना अटक

Songeer got a lively one out of the money debate | सोनगीरला पैशांच्या वादातून एकाला जीवंत जाळले

सोनगीरला पैशांच्या वादातून एकाला जीवंत जाळले

धुळे : उसनवार पैशांच्या वादातून एकाला मारहाण करीत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला़ त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना त्याचे शनिवारी पहाटे निधन झाले़ यामुळे सोनगीर गावात तणावाचे वातावरण आहे़
निधन झाल्याचे वृत्त गावात सकाळी उशिरा कळाल्यानंतर काही प्रमाणात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ हाणारीची ही घटना सोनगीरनजिक दोंडाईचा रोडवरील बसस्टेशनजवळील मोकळ्या जागेत १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी जखमी झालेला नंदु आधार पाटील (४१, रा़ चिंचगल्ली, सोनगीर) याने सोनगीर पोलीस ठाण्यात शनिवार १८ जानेवारी रोजी पहाटे फिर्याद दाखल केली होती़ त्यानुसार, संशयित घनश्याम नाना गुजर, मंगेश गुजर आणि मख्खन गुजर (रा़ सोनगीर) अशा तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ मयत तरुणाच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यामुळे वातावरण अधिकच तणावपुर्ण झाले होते़ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित संशयित तीन जणांना ताब्यात घेतले असल्याने वातावरण शांत असलेतरी तणाव मात्र कायम आहे़

Web Title: Songeer got a lively one out of the money debate