शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

सर आली धाऊन... रस्ता गेला वाहूऩ़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:32 IST

मुसळधार पावसाचा परिणाम : रुग्णांसह सर्वांचेच हाल, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

धुळे : साक्री रोडवरील जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी पाणी आल्याने पुन्हा एकदा एसीपीएम महाविद्यालय आणि रुग्णालयाचा शहराशी असलेला संपर्क तुटला़ परिणामी एसीपीएम महाविद्यालयाला दोन दिवसांची सुटी देण्याची वेळ आली़मोराणे, हरण्यामाळ परिसर तसेच नकाणे तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे साक्री रोड ते हरण्यामाळला जाणाºया रस्त्यावर तलावाच्या सांडव्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढू लागला. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचाही संपर्क तुटल्याने या ठिकाणी येणारे रुग्ण, महिला आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांचेच हाल झाले.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयातील नॉन कोविड रुग्ण जवाहर मेडीकल कॉलेजमध्ये हलविले जात आहेत़ पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने आता या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टर व संपूर्ण स्टाप यांची गैरसोय होणार आहे़ या आधी साधारण १५ ते २० दिवसांपुर्वी नकाणे तलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी रस्त्यावर आल्याने जवाहर मेडीकलचा संपर्क तुटला होता़ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पाणी शिरु नये म्हणून बांधलेल्या बांधामुळे पाणी अडले व ते रस्त्यावर आले होते़ यावेळी शेतकºयांनी शेतातून पायवाट दिल्याने जवाहर मेडीकलचे कर्मचारी, डॉक्टर कसेबसे पोहचले होते़ दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याचा प्रवाहाचा वेग तसाच होता़ परिणामी संपर्कच तुटल्याने दिवसभर सर्वांचे हालच झाले़ डॉक्टरांसह सर्वांना देखील रुग्णालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले़दुसºयांदा तुटला संपर्क, पुन्हा हालचनकाणे तलाव परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडला. त्यामुळे काही तासातच नकाणे तलावाला जोडणाºया सांडव्यातील पाण्याची पातळी वाढून तलाव ओसंडून वाहू लागला. तलावातील पाणी रस्त्यावर आले. पाण्याचा एक मोठा प्रवाह जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या भिंतीला लागून रस्त्यावर आला. त्यामुळे हरणमाळ व धुळे शहराचा संपर्क दुसºयांदा तुटला़ मागील १५ दिवसांपुर्वी देखील असाच संपर्क तुटलेला होता़ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्यावरही पाणी आल्याने तो रस्ता देखील बंद झाला होता.पुन्हा तीच पुनरावृत्ती, लक्ष कधी देणार?गेल्यावर्षी पावसातही या भागात पाणी साचून रस्ता बंद झाला होता. त्यामुळे हॉस्पिटलच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा विभागाला पत्र देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी केली होती. याशिवाय या रस्त्यावर मोरीचे बांधकाम करून रस्ता उंच करण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु ती मागणी पूर्ण न केल्याने पुन्हा हरण्यामाळचा धुळे शहराशी संपर्क तुटण्याची वेळ आली. हा प्रकार यापुर्वी देखील अनेकवेळा घडलेला आहे़ पुन्हा त्याची पुनरावृत्ती शुक्रवारी झाली, आता याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्नच आहे़

टॅग्स :Dhuleधुळे