शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मिनी लॉकडाऊनमध्ये पाचव्या दिवशी दुकानांचे शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 22:11 IST

महापालिकेसह पोलिसांच्या पथकाने फिरुन दुकाने बंद करण्याचे केले आवाहन, विनामास्क फिरणाऱ्यांना ठोठावला दंड

धुळे : जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशाने गुरुवारपासून शहरात ब्रेक द चेन च्या निबंर्धाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. सूचना देण्याचा पवित्रा घेतलेल्या महापालिकेच्या पथकसमवेत पोलीस रस्त्यावर उतरले होते. आदेशाचे उल्लंघन करुन सुरु ठेवण्यात आलेल्या दुकानांवर कारवाईची भूमिका घेतली गेली. त्यावेळी बघ्यानी गर्दी केल्याने पोलिसांना दंडूका उगारावा लागला. दरम्यान, मिनी लॉकडाऊनमध्ये पाचव्या दिवशी दुकानांचे शटर डाऊन झाल्याचे दिसून आले़शासनाने ५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निबंर्धानुसार ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जारी असलेली संचारबंदी, शॉपिंग मॉल व व्यापारी संकुलातील जीवनावश्यक तसेच वैद्यकीय सेवेशी संलग्न दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवारी दुपारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. निर्बंध असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बारपत्थर, आग्रा रोड, गल्ली नंबर ४, ऊसगल्ली आदी भागात पथकाने फिरुन दुकाने बंद केले. शुक्रवारी सकाळ ही मोहीम सुरु झाली. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली. पथकाने झाशी राणी चौकात राधाकृष्णन शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याच चौकातील एका रेस्टॉरंटवर दंडात्मक कारवाई केली. गर्दी जमा झाल्याने त्यांना हटविण्यात आले. यात पुन्हा जे विनामास्क आढळून आले त्यांना पकडून त्यांच्याकडून मनपा पथकाने दंड वसूल केला. या कारवाईमुळे आग्रा रोडसह बारा पत्थर, गल्ली नंबर ४, साक्री रोड यासह विविध भागातील दुकाने बंद झाली होती. केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने , मेडीकल सुरु होती.