गोटे यांच्या १३ उमेदवारांना शिवसेनेने दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:59 IST2018-12-05T04:59:36+5:302018-12-05T04:59:51+5:30

महापालिका निवडणुकीत मंगळवारी शिवसेनेने आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला.

Shiv Sena supports 13 candidates for Gotay | गोटे यांच्या १३ उमेदवारांना शिवसेनेने दिला पाठिंबा

गोटे यांच्या १३ उमेदवारांना शिवसेनेने दिला पाठिंबा

धुळे : महापालिका निवडणुकीत मंगळवारी शिवसेनेने आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला. याआधी आमदार गोटे यांनी सेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्याची एकप्रकारे परतफेडच सेनेने केली. दरम्यान, भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल रविवारपासून धुळ्यात तळ ठोकून आहेत. तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सोमवारी रात्री धुळ्यात मुक्कामी दाखल झाले आहे.
आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना रविवारी पाठिंबा जाहीर केला होता. त्याची परतफेडम्हणून शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीत सेनेने ४८ ठिकाणी तर लोकसंग्रामने ५९ ठिकाणी उमेदवार उभे केले आहे. यापूर्वीच गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला मनसेने पाठिंबा दिलेला आहे.

Web Title: Shiv Sena supports 13 candidates for Gotay