Shirud kills young woman's well | शिरुडला तरुणीची विहिरीत आत्महत्या

शिरुडला तरुणीची विहिरीत आत्महत्या

धुळे : रात्रीच्या अंधारात विहिरीत उडी घेऊन तरुणीने आपले जीवन संपविले असल्याची घटना धुळे तालुक्यातील शिरुड गावात घडली़ हा प्रकार शुक्रवारी सकाळी उजेडात आला़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
धुळे तालुक्यातील शिरुड येथील कालिकामाता मंदिराजवळ राहणाऱ्या गणेश भारत पारधी (२४) या तरुणाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, गणेश याची चुलत बहिण वंदना साहेबराव पारधी (२१) ही शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास आपल्या घरात झोपलेली होती़ त्यानंतर ती घरातील मंडळींच्या नजरा चुकवून घरातून गुपचूप निघून गेली़ सकाळी उठल्यानंतर ती घरात दिसून आली नाही़ तिची सर्वत्र शोधाशोध सुरु करण्यात आली़ तिच्या संदर्भातील चौकशी मैत्रिणी, नातेवाईकांकडे करण्यात आली़ पण, ती मिळून आली नाही़
तिची शोधाशोध सुरु असताना सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावातीलच सुरेखाबाई पारधी या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या़ त्यावेळी त्यांना वंदना ही विहिरीतील पाण्यात तरंगतांना आढळून आली़ यानंतर तिचा मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी धावाधाव सुरु झाली़ गावातीलच समाधान पारधी, दादा पारधी, अनिल पारधी यांनी वंदना हिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला़ त्यानंतर तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉ़ पुर्वा पाटील यांनी तपासून वंदना हिला मृत घोषीत केले़
दरम्यान, वंदना हिचे लग्न ठरले होते़ परंतु वंदना हिच्या पाठीवर पांढरे कोड असल्याने तिचे लग्न मोडले होते़ परिणामी ती तणावात होती़ त्यातून तिने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे़

Web Title: Shirud kills young woman's well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.