शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पाण्याचे टॅँकर आडवे लावून केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:06 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गुºहाडपाणी येथे ग्रामरक्षक दलातर्फे बंदोबस्त

शिरपूर : राज्याच्या ग्रामीण भागात अवैध मद्यनिर्मिती व मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसहभागातून स्थानिक पातळीवर ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्देश काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्याची अमलबजावणी करून ग्रामस्तरावर ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. हीच रक्षक दल ग्रामीण भागात कोरोना संक्रमण टाळण्यासाठी पुढे सरसावली असून सीमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवत आहे.शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील महाराष्ट्र- मध्यप्रदेशच्या सिमेवर वसलेल्या गुºहाडपाणी येथे ग्रामरक्षक दलाने सिमेवर पाण्याचे टँकरच आडवे करून व काटेरी झुडुपे ठेवत गाव बंदी केली आहे़ त्याच बरोबर या सिमेरेषेवर दिवस-रात्र पहारा देण्यात येवून पुर्णपणे पाळत ठेवण्यात आले आहे.कोरोना बाधित सेंधवा शहराच्या लागून असलेल्या या गावांना पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. यासाठी येथील तरुण पोलिस पाटील सरकार पावरा यांनी पोलिस प्रशासनाकडे पोलिस बंदोबस्तसाठी मागणी केली आहे़ तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगेतील मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या शेवटच्या दुर्गम क्षेत्रातील गावे आहेत. कोरोनाचे सावट या गावांवर आहे.सेंधवा सिमेलगत गावांची अवस्था अत्यंत विदारक आहे. गुºहाडपाणी ग्रृप ग्रामपंचायती अंतर्गत सितारापाडा, थुवानपाणी, मेंढाबर्डी, सामºयादेवी, कंज्यापाणी, निशानपाणी, प्रधानदेवी, पळसपाणी, कडश्यापाणी, निंबाबर्डी, धाबादेवी असे जवळपास १८ लहानमोठी गाव-पाडे आहे. वरील सर्व गाव-पाडे ही मध्यप्रदेश सीमेवर आहेत़ या गाव-पाड्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सेंधवाशी सबंध येतो. या परीसरात अनेक लहान पायवाट असून चोरट्या मार्गांनी नागरीकांचे ये-जा सुरु आहे़ याठिकाणी रात्री-बेरात्री चोरट्या मार्गाने वाहतुक सुरु असते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा या गावांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामिण भागात शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून सर्वत्र गाव शिवार बंद केले आहेत. तरी देखील गांभीर्याने योग्य खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. गावातील दारूसह अन्य अवैध व्यावसायांना आळा घालण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करणे असा या हेतुने दलाची स्थापना करण्यात आली, परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे तरुण दिवस-रात्र पाळत ठेवत मध्यप्रदेश मधून येणाऱ्यांना चांगलेच धुडकावून लावत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे