शिंदखेडा पोलिसांकडून ४ गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:42 IST2019-06-03T12:42:05+5:302019-06-03T12:42:30+5:30
यशस्वी कामगिरी : फरार आरोपींसाठी विशेष पथक तैनात

शिंदखेडा पोलिसांकडून ४ गुन्हे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली होती़ त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिंदखेडा पोलिसांच्या पथकाने विविध ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत़ दरम्यान, विविध प्रकरणातील फरार आरोपींचा शोध मात्र सुरु आहे़
झुलेलाल मंदिर चोरी, एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा, निवडणूक काळात मतदान जनजागृतीच्या एलसीडी चोरीस गेला होता त्याचा देखील छडा लावण्यात आला आहे़ शिवाय पाटण येथील आशापुरी देवी मंदिराच्या निवासस्थानातून भक्तांचे चोरीस गेलेले मोबाईल देखील हस्तगत करण्यात आलेले आहे़
या गुन्ह्यात पवन कोमलसिंग गिरासे, रमेश उर्फ राहुल सुनील मराठे, रियाज उर्फ राजा रफिक शेख (सर्व रा़ शिंदखेडा) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून चोरलेला माल काढून दिला आहे़ याच गुन्ह्यातील अल्केश उर्फ भटू सुरेश माळी, राहुल गोपाळ पाटील आणि अजय (पूर्ण नाव माहित नाही) हे अद्याप फरार आहेत़ त्यांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून त्यांच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येईल़ त्यांच्याकडून शिंदखेडा शहरातील बरेच चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़ सदर आरोपी हे सराईत असल्याने पोलिसांना गुंगारा देवून फरार होण्यात तरबेज आहेत़ राहुल गोपाळ पाटील याने शिंदखेडा शहरात अॅक्वा रिदम पाणी वॉटर वाल्यास पिस्तोल लावून धमकावले असून त्याच्या मागावर विशेष पथक नेमण्यात आले आहे़ त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास शिंदखेडा पोलिसांना आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शिरपूर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, महिला पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप, पोलीस उपनिरीक्षक एस़ एच़ सैय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे, रफिक मुल्ला, पोलीस कर्मचारी प्रविण निंबाळे, संजय सैंदाणे, एकलाख पठाण, बिपीन पाटील, आबा भील, मयूर थोरात, हर्षल चौधरी, ललित काळे, कपिल लिंगायत, प्रशांत पवार यांनी ही कारवाई केली़