शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 14:48 IST

  धुळे - जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार व भाजपाचे पूर्व प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया (वय ...

 

धुळे - जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार व भाजपाचे पूर्व प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया (वय ७१ वर्ष) यांचे १० मार्च रोजी पुणे येथे आपल्या मुलाकडे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथेच १० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.माजी आमदार धरमचंद चोरडिया हे १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. १९७८-८१ या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होती. १९८२ साली ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय चिटणीस झाले. त्याकाळात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भाजपात प्रदेश चिटणीसपद मिळाले. त्यानंतर ते प्रदेश संघटनमंत्री होते.

नगरसेवक - धरमचंद चोरडिया १९८४ ते ९० याकाळात धुळे पालिकेचे सदस्य होते. त्यानंतर ते १९९२ साली जूनमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती.

आणीबाणी आणि मराठवाडा नामांतर आंदोलनात कारावास - आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावास भोगला होता. तसेच मराठवाडा नामांतर आंदोलनातही कारावास भोगला होता. ते जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदावरही होते.

अपघात - विधान परिषदेचे आमदार असतांना १९९२ मध्येच त्यांचा जोधपूर येथे कौटुंबिक कार्यक्रमास गेले असतांना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून लांब गेले होते. धुळ्यात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जेही नेते आले त्यांनी धरमचंद चोरडिया यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.