पत्नीच्या संमतीशिवाय केले दुसरे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:01+5:302021-03-27T04:38:01+5:30
धुळे : पत्नीच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले म्हणून पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला ...

पत्नीच्या संमतीशिवाय केले दुसरे लग्न
धुळे : पत्नीच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले म्हणून पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा प्रदीप खताळ (वय ३३, रा. पोळा चाैक, साक्री) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे येथे हमाल मापाडी प्लाॅट भागात सासरी तिचा छळ करण्यात आला. सासरच्यांनी घर घेण्यासाठी २० लाखांचे कर्ज काढण्यासाठी दबाव आणला तसेच संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. अंगावरील स्त्रीधनही काढून घेतले. याप्रकरणी पती प्रदीप नारायण खताळ, सासू प्रमिला नारायण खताळ, सासरे नारायण निंबाजी खताळ, दीर संदीप नारायण खताळ, जयश्री संदीप खताळ, योगिनी मोहन थोरात यांच्यासह १८ जणांविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ४०६, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकाॅन्स्टेबल आर. ए. ठाकरे करत आहेत.