धुळ्यातील देवपूर भागात सलग दुसºया दिवशी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 11:26 IST2019-06-17T11:26:00+5:302019-06-17T11:26:27+5:30
जीटीपी स्टॉप परिसर : रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

धुळ्यातील देवपूर भागात सलग दुसºया दिवशी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील जीटीपी स्टॉपजवळील जय गजानन कॉलनी भागातील रोहिदास नवल माळी यांच्या घरात चोरट्यांनी चोरी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली़ घरातील व्यक्ती हे स्लॅबवर झोपलेले असताना चोरट्यांनी ही संधी साधत घरात प्रवेश केला़ संसारोपयोगी साहित्याची नासधूस करीत २५ हजार रोकडसह सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला़ सकाळी झोपेतून उठल्यानंतर ही घरात चोरी झाल्याची बाब समोर आली़ घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळविण्यात आली़ श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ पंचनामा करण्याचे काम सुरु आहे़